गाेपाल अग्रवाल हत्याकांडातील आराेपींना पाेलीस काेठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:24 AM2020-12-30T04:24:48+5:302020-12-30T04:24:48+5:30
अकाेला : बाेरगाव मंजू येथील संजय स्टाेन क्रशरचे व्यवस्थापक गाेपाल अग्रवाल यांची सागर काेठाळे व त्याच्या साथीदारांनी गाेळ्या झाडून ...
अकाेला : बाेरगाव मंजू येथील संजय स्टाेन क्रशरचे व्यवस्थापक गाेपाल अग्रवाल यांची सागर काेठाळे व त्याच्या साथीदारांनी गाेळ्या झाडून २६ डिसेंबर राेजी हत्या केल्यानंतर या प्रकरणातील आराेपींना साेमवारी अटक करण्यात आली. या आराेपींना मंगळवारी न्यायालयासमाेर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १ जानेवारी २०२१ पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली.
अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर २६ डिसेंबर रोजी रात्री गिट्टी खदान व्यावसायिक व संजय स्टोन क्रशरचे मालक संजय अग्रवाल यांचे चुलत भाऊ गोपाल हनुमानप्रसाद अग्रवाल (४५, रा. खोलेश्वर) यांच्यावर गाेळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली हाेती. या हत्याकांडाचा तपास करताना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या नेतृत्वातील पथकाने चार आराेपींना शोधून काढण्यात त्यांना यश आले. बोरगाव मंजू येथील संजय स्टोन क्रशरचे पर्यवेक्षक राजेश बापूराव भांगे (३५, रा. संतनगर, हिंगणा रोड) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून खुनातील मुख्य आरोपी सागर कोठाळे, विजय अंबादास राठोड (२४, रा. कातखेडा), लखन वसंता राठोड (२१, रा. कुंभारी), रणधीर भारत मोरे (२३, ता. राहुलनगर, शिवणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या आराेपींना मंगळवारी न्यायालयासमाेर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १ जानेवारी २०२० पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली. घटनेत लुटलेले दीड लाख व खुनासाठी वापरण्यात आलेल्या देशी कट्ट्याचा पोलीस शोध घेत आहेत. यासाेबतच देशी कट्टा खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची पाेलिसांनी चाैकशी सुरू केली असून, त्याचाही शाेध घेण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी आराेपी वाढण्याची शक्यता आहे.