रोहयोचा लाभ मर्जीतील लोकांना दिल्याचा आरोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:34 AM2021-03-04T04:34:56+5:302021-03-04T04:34:56+5:30
पंचायत समितीत दिलेल्या तक्रारीत सन २०१६ ते २०२० पर्यंतचे घरकुल लाभार्थी आहेत. आम्हाला घरकुल योजनेंतर्गत मिळणारा रोजगार हमी ...
पंचायत समितीत दिलेल्या तक्रारीत सन २०१६ ते २०२० पर्यंतचे घरकुल लाभार्थी आहेत. आम्हाला घरकुल योजनेंतर्गत मिळणारा रोजगार हमी योजनेचा लाभ आतापर्यंत मिळाला नाही. संबंधित प्रकरणाची चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रभाकर घनबहादूर, मोतीराम घनबहादूर, कपिल तेलगोटे, एम.एम. तेलगोटे, काशीराम तेलगोटे यांच्या सह अनेक लाभार्थ्यांच्या सह्या आहेत.
रोजगार सेवकाला नोटीस देऊन चौकशी करण्यात येणार आहे. पूर्ण रेकॉर्ड तपासण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
-किशोर द. शिंदे, गटविकास अधिकारी
ज्या लाभार्थ्यांनी जे जॉबकार्ड दिले आहे. तेच जॉबकार्ड त्यांच्या फाईलला लावलेले आहे. जे जॉबकार्ड दिले आहे त्यामध्ये काही जणांचे खाते लिंक नाही. खाते लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नसतील.
-शेषराव घनबहादूर, रोजगार सेवक, वरूर विटाळी