न्यायालयाची दिशाभूल करणारा आराेपी कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 10:55 AM2021-07-27T10:55:00+5:302021-07-27T10:55:09+5:30

Crime News : न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने आराेपीची कारागृहात रवानगी केली.

Accused of misleading the court goes into jail | न्यायालयाची दिशाभूल करणारा आराेपी कारागृहात

न्यायालयाची दिशाभूल करणारा आराेपी कारागृहात

Next

अकाेला : एका करारनाम्यावर चार्टर्ड अकाउंटंटची बनावट स्वाक्षरी करून करारनामा जिल्हा व सत्र न्यायालयात सादर करून न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या गाेपाल हाडाेळे याची पाेलीस काेठडी संपल्याने रामदास पेठ पाेलिसांनी त्याला साेमवारी न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने आराेपीची कारागृहात रवानगी केली.

सिंधी कॅम्प येथील रहिवासी चार्टर्ड अकाउंटंट विनय थावरानी यांनी रामदास पेठ पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गोपाल हाडोळेने न्यायालयात बनावट करारनामा सादर केला होता. या करारनाम्यावर चार्टर्ड अकाउंटंट विनय थावरानी यांच्या स्वाक्षऱ्या खोट्या असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर विनय थावरानी यांनी नागपूर येथील हस्ताक्षरतज्ज्ञांकडून स्वाक्षरीची तपासणी केली असता गोपाल होडोळेने सादर केलेल्या करारनाम्यातील विनय थावरानी यांची स्वाक्षरी बनावट असल्याचा अहवाल या तज्ज्ञांनी दिला हाेता. त्याआधारे विनय थावरानी यांनी रामदास पेठ पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी गोपाल हाडोळे त्याची पत्नी प्रतिभा हाडोळे व सचिन मानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला हाेता. रामदास पेठ पोलिसांनी गाेपाल हाडोळे यास अटक केली हाेती. त्यानंतर त्याला न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने आराेपीस दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली हाेती. पाेलीस काेठडी संपल्यानंतर आराेपीस न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.

Web Title: Accused of misleading the court goes into jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.