आकिब खून प्रकरणातील आरोपी कारागृहात

By admin | Published: June 30, 2016 01:48 AM2016-06-30T01:48:24+5:302016-06-30T01:48:24+5:30

न्यायालयाने ४ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Accused in the murder case of Aakib Jail | आकिब खून प्रकरणातील आरोपी कारागृहात

आकिब खून प्रकरणातील आरोपी कारागृहात

Next

अकोला: हमजा प्लॉटमध्ये झालेल्या शेख आकिब खूनप्रकरणातील चार आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणातील एका आरोपीला ३0 जूनपर्यंत पोलीस कोठडी असून, त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वाशिम बायपास रोडवरील हमजा प्लॉटमध्ये नवाबपुरा येथील रहिवासी शेख आकिब शेख आरीफ याच्यावर सात जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आकिबला सवरेपचार रुग्णालयात नेत असताना, त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. यामध्ये शेख लखन, शेख कासम, शेख वसीम, शेख मजीद, शेख फिरोज, शेख हसन आणि शेख रियाज यांचा समावेश आहे. जुने शहर पोलिसांनी यापैकी शेख कासम शेखजी, शेख मजीद शेख इब्राहिम, शेख हसन शेख इब्राहिम व शेख वसीम शेख बशीर या आरोपींना अटक केली असून, त्यांची बुधवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने ४ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Web Title: Accused in the murder case of Aakib Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.