खून प्रकरणातील आरोपी ४८ तासांत जेरबंद

By admin | Published: April 30, 2017 03:17 AM2017-04-30T03:17:53+5:302017-04-30T03:17:53+5:30

ट्रकचालकाची क्लीनरने केली होती हत्या.

The accused in the murder case lodged in 48 hours | खून प्रकरणातील आरोपी ४८ तासांत जेरबंद

खून प्रकरणातील आरोपी ४८ तासांत जेरबंद

Next

मूर्तिजापूर : आसरा फाटा मूर्तिजापूर येथे कोहिनूर ढाब्याजवळ ट्रक क्र. जीजे 0३ एझेड ११३३ च्या चालकाची पैशांच्या वादातून क्लीनरने हत्या केल्याची घटना २५ एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणाचा मूर्तिजापूर शहर पोलिसांनी ४८ तासांत आरोपी क्लीनर रशीद खान मुस्तफा खान याला गजाआड केले.
सदर गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक मीणा, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, पोलीस उपविभागीय अधिकारी मनवरे, पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहराचे पोलीस उपनिरीक्षक जनार्धन खंडेराव, ना.पो.काँ. मो. अय्याज मो. जिलानी, संजय खंडारे, संतोष गवई, पो.काँ. श्याम मोहाळे यांचे दोन पथक तयार करून रवाना केले होते. त्यानुसार मुंबई येथील पथकातील पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव, मो. अय्याज मो. गिलानी, श्याम मोहाळे यांनी मुंबई येथे जाऊन आरोपीची माहिती घेतली. सदर आरोपी हा कमला नगर बेंगणवाडी गोवंडी येथे राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीवरून २८ एप्रिल रोजी सदर ठिकाणी पथकाने धाड टाकून रशीद खान मुस्तफा खान (वय २0 वर्षे) रा. दंदुपूर कुर्शियान तहसील राणीगंज जिल्हा प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश यास जेरबंद केले. आरोपीने ट्रकचालकाचा पैशांच्या लालसेपोटी खून केला असे कबूल केले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, पोलीस उपविभागीय अधिकारी मनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. पडघन, स.पो.उप.नि. गणेश कोथळकर, जनार्धन खंडेराव हे करीत आहेत.

Web Title: The accused in the murder case lodged in 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.