आरोपी रात्री-बेरात्री प्राध्यापक निवासस्थानी यायचे!
By admin | Published: July 10, 2015 01:30 AM2015-07-10T01:30:52+5:302015-07-10T01:30:52+5:30
युवकाचे लैंगिक शोषणप्रकरणात साक्षीदारांच्या जबाबातून समोर आलेली माहिती.
अकोला: राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृह आणि बगिच्याची देखभाल करणार्या युवकाच्या लैंगिक शोषणप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुरुवारी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. या प्रकरणातील आरोपी, भारतीय सेवा सदनचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका आणि माजी सचिव जुगलकिशोर रुंगटा हे पीडित युवकासोबत रात्रीच्या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक निवासस्थानी यायचे, असा जबाब साक्षीदारांनी नोंदविला आहे. अकोल्यातील राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहामध्ये रोजंदारीने काम करणार्या युवकाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून निरंजनकुमार गोयनका आणि जुगलकिशोर रुंगटा यांच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पीडित युवक, तसेच एका माजी मुख्याध्यापकाचा जबाबही नोंदविला आहे. प्राध्यापक क्वार्टरमध्ये राहणार्या पाच साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी बुधवारी नोंदविले. दोन्ही आरोपी पीडित युवकाला घेऊन प्राध्यापक निवासस्थानी यायचे, रात्रभर थांबून ते सकाळी निघून जायचे, अशी माहिती या साक्षीदारांनी पोलिसांना दिली.