पळसोद हत्याकांडातील आरोपीला जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:36+5:302021-06-26T04:14:36+5:30

पळसोद येथील रहिवासी रवींद्र गणेश पाटेकर याने त्याचे चुलत काका किसन पाटेकर यांची क्षुल्लक कारणावरून हत्या केली होती. या ...

Accused in Palsod murder denied bail | पळसोद हत्याकांडातील आरोपीला जामीन नाकारला

पळसोद हत्याकांडातील आरोपीला जामीन नाकारला

Next

पळसोद येथील रहिवासी रवींद्र गणेश पाटेकर याने त्याचे चुलत काका किसन पाटेकर यांची क्षुल्लक कारणावरून हत्या केली होती. या प्रकरणी दहीहंडा पोलिसांनी रवींद्र पाटेकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपी रवींद्र पाटेकर याने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला. प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.डी. पतंगे यांच्या न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपी फिर्यादी व साक्षीदार हे एकाच गावातील रहिवासी असल्याने आरोपीला जामीन दिल्यास, तो फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, अशा प्रकारचा युक्तिवाद सहायक सरकारी विधिज्ज्ञ अजित देशमुख यांनी केला. त्यानंतर, प्रभारी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

Web Title: Accused in Palsod murder denied bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.