पैसाळीप्रकरणातीलआरोपी जाधव कारागृहात
By admin | Published: October 23, 2016 02:19 AM2016-10-23T02:19:39+5:302016-10-23T02:19:39+5:30
चांगेफळ पैसाळी येथील सशस्त्र हैदोसाचा सूत्रधार योगेश जाधव याची न्यायालयीन कोठडीत रवानगी.
अकोला, दि. २२- चांगेफळ पैसाळी गावावर झालेल्या सशस्त्र हैदोसाचा सूत्रधार मांस विक्रेता योगेश जाधव याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडी रवानगी केली. योगेश जाधवच्या काही साथीदारांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
चांगेफळ पैसाळी या गावात योगेश जाधव याने मांस विक्रीचे दुकान लावले होते. या दुकानाला गावातील महिलांनी विरोध केल्यानंतर त्याला दुकान हटवावे लागले; मात्र याचा रोष चांगेफळ पैसाळीवासीयांवर काढण्यासाठी योगेश जाधवने येथील एका महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना केली. त्यानंतर दोन गावांत आणि समाजात तेढ निर्माण झाल्याने १00 ते १५0 लोकांनी या गावावर सशस्त्र हैदोस घातला होता. या प्रकरणी बाश्रीटाकळी पोलिसांनी ४५ आरोपींना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता, महापुरुषांची विटंबना सुकळी पैसाळी येथील रहिवासी आणि मांस विक्रेता योगेश जाधव नामक व्यक्तीने केल्याचे समोर आले. त्याला अटक करून पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. शनिवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांसह लोकप्रतिनिधीसुद्धा गावात शांतता टिकविण्यासाठी प्रयत्नात आहेत.
३0 वर आरोपी फरार
चांगेफळ पैसाळी गावावर हल्ला करणारे ३0 वर आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ७0 च्यावर आरोपींवर गुन्हे दाखल असून, ४५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.