तुषार पुंडकर हत्याकाडांतील आरोपीचा जामीन नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:20 AM2021-04-01T04:20:05+5:302021-04-01T04:20:05+5:30

स्थानिक शहर पोलीस वसाहतीत २१ फेब्रुवारी रोजी तुषार पुंडकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीसांनी ...

Accused in Tushar Pundkar murder denied bail | तुषार पुंडकर हत्याकाडांतील आरोपीचा जामीन नामंजूर

तुषार पुंडकर हत्याकाडांतील आरोपीचा जामीन नामंजूर

Next

स्थानिक शहर पोलीस वसाहतीत २१ फेब्रुवारी रोजी

तुषार पुंडकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करुन तपास केला. या तपासात गोळ्या घालणाऱ्या अल्पेश दुधे व श्याम नाठे या आरोपींना पवन सेदानी यांने आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी बंदुक व गोळ्या उपलब्ध करुन दिल्या. तसेच आरोपींना पैसे पुरविले मोटारसायकल घेऊन दिली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. शिवाय पवन सेदानीला आरोपी शहबाज खान या आरोपीने पुरविलेल्या बंदुक मधील एक गोळी सेदानीचे स्कुटीतील गाडीत मिळुन आली. ही गोळी ज्या बंदुकीमधुन तुषार वर फायर करण्यात आला त्या बंदुकीमधीच असल्याचा बँलेस्टिक अहवाल आल्याने कट रचुन पुंडकरची नियोजनबद्ध हत्या केल्याचे तपासात उघड झाले. या हत्याकांड सहभागी असल्याचा कबुली जबाब आरोपी पवन सेदानी यांने दिल्याचे पोलीसांनी नमुद केले. पवन सेदानी हा या हत्याकाडांतील इतर आरोपीसोबत गत वर्षभरापासून कारागृहात आहे.दरम्यान या हत्याकांडाचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाल्यावर आरोपी पवन सेदानी यांने प्रथमच जामीनकरीता अर्ज दाखल केला. या अर्जावर अकोट न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. या खटल्यात सरकारने अँड उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. अँड निकम यांचे मार्गदर्शनाखाली अँड अजित देशमुख यांनी लेखी उत्तर न्यायालयात सादर केले. तसेच युक्तिवाद करुन आरोपीविरुद्ध जलदगतीने खटला चालविण्यासाठी सरकार पक्ष तयार आहे. आरोपीविरुद्ध सबळ पुरावे असुन जामीन दिल्यास होणारे संभाव्य प्रकाराची शक्यता व्यक्त करीत न्यायालयात युक्तिवाद केला. यावेळी आरोपीचे वतीने अँड राजेश जाधव यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपी पवन सेदानीचा जामीन अर्ज नामंजुर केला. या खुन खटल्याचा तपास कोरोना कालावधी झाला,त्यामुळे या तपासात कायकाय समोर आले असुन या प्रकरणाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Accused in Tushar Pundkar murder denied bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.