जितेंद्र काठोळे यांना आचार्य पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:10 AM2020-12-28T04:10:53+5:302020-12-28T04:10:53+5:30

लक्षणे दिसताच घ्या वैद्यकीय सल्ला अकोला: गत आठवड्यापासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत असून अनेकांना सर्दी, खोकला तसेच तापीचे लक्षणे ...

Acharya degree to Jitendra Kathole | जितेंद्र काठोळे यांना आचार्य पदवी

जितेंद्र काठोळे यांना आचार्य पदवी

Next

लक्षणे दिसताच घ्या वैद्यकीय सल्ला

अकोला: गत आठवड्यापासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत असून अनेकांना सर्दी, खोकला तसेच तापीचे लक्षणे दिसून येत आहेत. रुग्णांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच डॉक्टरांच्या सूचनेनुसार औषधोपचारासह कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.

जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा कायम

अकोला: मागील आठ महिन्यांपासून जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. शासनाच्या आवाहनानंतर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात लक्षणीय रक्तसंकलन झाले. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला; मात्र यातून वर्षभरातील तूट भरून निघणे कठीण आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांसह रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

‘नो मास्क, नो सवारी’चा विसर

अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विशेष खबरदारी म्हणून ‘नो मास्क, नो सवारी’ हे अभियान राबविण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ऑटोचालकांसह नागरिकांनीही मास्क घालूनच प्रवास केला; मात्र काही दिवसांतच या अभियानाकडे अनेकांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

Web Title: Acharya degree to Jitendra Kathole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.