अकोला शहरातील रस्ते कामांचे ७९ नमुने तपासणीसाठी यंत्रणांच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 02:25 PM2018-08-04T14:25:27+5:302018-08-04T14:28:17+5:30

अकोला : शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणात (सोशल आॅडिट) गत २७ जुलैपर्यंत शहरातील सहा रस्ते कामांचे घेण्यात आलेले ७९ नमुने तपासणीसाठी तीन यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिला.

Acquisition of 79 samples of roads in Akola city | अकोला शहरातील रस्ते कामांचे ७९ नमुने तपासणीसाठी यंत्रणांच्या ताब्यात 

अकोला शहरातील रस्ते कामांचे ७९ नमुने तपासणीसाठी यंत्रणांच्या ताब्यात 

Next
ठळक मुद्देसामाजिक व तांत्रिक अंकेक्षण (आॅडिट) करण्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १६ जुलै रोजी काढले होते. त्यानुसार शहरातील रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी गत २२ ते २७ जुलै या कालावधीत सहा रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले. तीन पथकांमार्फत घेण्यात आलेले ७९ नमुने सीलबंद करून, जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत.


अकोला : शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणात (सोशल आॅडिट) गत २७ जुलैपर्यंत शहरातील सहा रस्ते कामांचे घेण्यात आलेले ७९ नमुने तपासणीसाठी तीन यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार संबंधित यंत्रणांमार्फत रस्ते कामांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
शासनाकडून प्राप्त निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यानुषंगाने शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी सामाजिक व तांत्रिक अंकेक्षण (आॅडिट) करण्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १६ जुलै रोजी काढले होते. त्यानुसार शहरातील रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी गत २२ ते २७ जुलै या कालावधीत सहा रस्ते कामांचे नमुने घेण्यात आले. तीन पथकांमार्फत घेण्यात आलेले ७९ नमुने सीलबंद करून, जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. रस्ते कामांच्या या नमुन्यांची तपासणी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गुणनियंत्रण जलसंपदा विभाग, अकोला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हा प्रयोगशाळेमार्फत करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने रस्ते कामांचे ७९ तपासणीसाठी संबंधित यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला.

‘या’ रस्ते कामांच्या नमुन्यांची होणार तपासणी!
शहरातील रस्ते कामांच्या ‘सोशल आॅडिट’मध्ये सहा रस्ते कामांचे ७९ नमुने तीन पथकांमार्फत घेण्यात आले. त्यामध्ये मुख्य डाकघर ते सिव्हिल लाइन चौक, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक, अग्रसेन चौक ते दुर्गा चौक, माळीपुरा ते मोहता मिल चौक, अशोक वाटिका ते सरकारी बगीचा आणि गोरक्षण रोड (नेहरू पार्क ते महापारेषण कार्यालयापर्यंत) इत्यादी रस्ते कामांचा समावेश असून, या रस्ते कामांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणात घेण्यात आलेले ७९ नमुने तपासणीसाठी तीन यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येत असल्याचा आदेश ३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाºयांनी दिला आहे. त्यानुसार रस्ते कामांचे नमुने संबंधित यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येत आहेत.
-संजय खडसे, उप विभागीय अधिकारी,
तथा नोडल अधिकारी.

 

Web Title: Acquisition of 79 samples of roads in Akola city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.