विमानतळ जमीन संपादन; सोमवारी मंत्रालयात बैठक!
By admin | Published: June 10, 2017 02:28 AM2017-06-10T02:28:56+5:302017-06-10T02:28:56+5:30
विधान परिषद सभापतींनी ही बैठक बोलावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमीन संपादनाच्या मुद्यावर सोमवार, १२ जून रोजी मुंबई येथील मंत्रालयात संबंधित अधिकार्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केलेल्या मागणीनुसार, विधान परिषद सभापतींनी ही बैठक बोलावली आहे.
अकोल्याच्या शिवणी विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी आवश्यक असलेली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ६0 हेक्टर जमीन संपादन करण्यात आली असून, आणखी ३४ हेक्टर खासगी जमीन संपादन करावयाची आहे.
खासगी जमीन संपादन करण्यासाठी शासनामार्फत निधी मंजूर करण्यात आला आहे; मात्र जमीन महसूल विभाग संपादन करणार की भारतीय विमान पत्तन प्राधिकरण, याबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पृष्ठभूमीवर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली खासगी जमीन महसूल विभागामार्फत संपादन करण्यात यावी, त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्यांची बैठक बोलावून जमीन संपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे केली. त्यानुषंगाने विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमीन सं पादनाच्या मुद्यावर १२ जून रोजी विधान परिषद सभापतींनी संबंधित अधिकार्यांची बैठक बोलावली आहे.