अकोला जिल्ह्यात २३४ शेतकरी आढळले तीव्र मानसिक तणावग्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 02:17 PM2018-04-12T14:17:35+5:302018-04-12T14:17:35+5:30

अकोला : प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांचे समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रमात जिल्ह्यात मार्चअखेर गत वर्षभराच्या कालावधीत २ लाख ९ हजार ९४६ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये २३४ शेतकरी तीव्र मानसिक तणावग्रस्त आढळून आले.

Across the district, 234 farmers found severe mental stress! | अकोला जिल्ह्यात २३४ शेतकरी आढळले तीव्र मानसिक तणावग्रस्त!

अकोला जिल्ह्यात २३४ शेतकरी आढळले तीव्र मानसिक तणावग्रस्त!

googlenewsNext
ठळक मुद्देगत वर्षभरात आरोग्य विभागामार्फत २ लाख ९ हजार ९४६ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. गत वर्षभरात जिल्ह्यात २३४ शेतकरी मानसिकदृष्ट्या तीव्र तणावात आढळून आले.२३४ शेतकºयांवर अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय कक्षात उपचार करण्यात आले.

 - संतोष येलकर

अकोला : प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांचे समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रमात जिल्ह्यात मार्चअखेर गत वर्षभराच्या कालावधीत २ लाख ९ हजार ९४६ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये २३४ शेतकरी तीव्र मानसिक तणावग्रस्त आढळून आले.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनामार्फत प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकºयांचे समुपदेशन व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात गत वर्षभरात आरोग्य विभागामार्फत २ लाख ९ हजार ९४६ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार गत वर्षभरात जिल्ह्यात २३४ शेतकरी मानसिकदृष्ट्या तीव्र तणावात आढळून आले. मानसिकदृष्ट्या तीव्र तणावात आढळून आलेल्या २३४ शेतकºयांवर अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय कक्षात उपचार करण्यात आले.

१७६ शेतकऱ्यांचे समुपदेशन!
प्रेरणा प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात १७६ शेतकरी सौम्य स्वरूपात मानसिक तणावात असल्याचे आढळून आले. सौम्य तणावात आढळून आलेल्या संबंधित शेतकºयांचे आरोग्य यंत्रणांमार्फत समुपदेशन (कौन्सिलिंग) करण्यात आले.

मध्यम स्वरूपात तणावग्रस्त ४४३ शेतकऱ्यांवर औषधोपचार!
सर्वेक्षणात जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ४४३ शेतकरी मध्यम स्वरूपात मानसिक तणावात असल्याचे आढळून आले. मध्यम स्वरूपात तणावग्रस्त आढळून आलेल्या शेतकºयांवर आरोग्य यंत्रणांमार्फत औषधोपचार करण्यात आले.

सर्वेक्षणात असे आढळले तणावग्रस्त शेतकरी!
सौम्य तणावग्रस्त :   १७६
मध्यम तणावग्रस्त :  ४४३
तीव्र तणावग्रस्त :      २३४
........................................
एकूण :                      ८५३

प्रेरणा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात आशा स्वयंसेविकांमार्फत २ लाख ९ हजार ९४६ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये २३४ शेतकरी मानसिकदृष्ट्या तीव्र मानसिक तणावग्रस्त असल्याचे आढळून आले. या तणावग्रस्त शेतकºयांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विशेष कक्षात उपचार करण्यात आले.
-डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

 

Web Title: Across the district, 234 farmers found severe mental stress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.