विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या १२४ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 06:49 PM2018-07-04T18:49:41+5:302018-07-04T18:52:08+5:30
अकोला: शहरासह जिल्हयात विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या १२४ वाहनांवर वाहतुक शाखेचे प्रमूख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात बुधवारी कारवाई करण्यात आली.
अकोला: शहरासह जिल्हयात विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या १२४ वाहनांवर वाहतुक शाखेचे प्रमूख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात बुधवारी कारवाई करण्यात आली. १२४ वाहने जप्त करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेल्या आॅटो, मॅक्झीमो व इतर काही वाहनांना या वाहतुकीचा परवानाच नसताना त्यांनी विद्यार्थ्यांना वाहनात कोंबून वाहतुक होत असल्याचे दिसून आले. यावरुन वाहतुक शाखा प्रमूख विलास पाटील यांनी बुधवारी धडक मोहीम राबवून शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतुक करीत असलेल्या १२४ वाहनांची तपासणी केली. यावेळी वाहनांचे दस्तावेज, चालकाचा परवाणा, शालेय विद्यार्थ्यांची वाहतुकीसाठी आवश्यक असलेला परवाना तपासला असता या वाहन चालकांकडे यामधील एकही दस्तावेज नसल्याचे उघड झाले. त्यामूळे ही १२४ वाहने ताब्यात घेण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये काही आॅटोंना केवळ ३ प्रवासी वाहतुक करण्याची परवाणगी असतांना त्यांनी प्रवासी क्षमतेपेक्षा अधीक प्रवासी बसवून वाहतुक केल्याचेही समोर आले आहे. त्यामूळे वाहतुक शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
बेशीस्त वाहतुकीला ताळयावर आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. मुलांच्या पालकांनीही जागरुक होण्याची गरज आहे. एका आॅटोमध्ये १० पेक्षा अधीक प्रवासी बसविण्यात येत असून विद्यार्थ्यांची संख्याही मोठया प्रमाणात असते, त्यामूळे ही वाहतुक प्रचंड धोकादायक असल्याने अशा वाहनांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, म्हणूण बुधवारी ही धडक मोहिम राबवून १२४५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
- विलास पाटील, वाहतुक शाखा प्रमूख, तथा ठाणेदार सिटी कोतवाली,अकोला.