अकोला शहरातील १८ हजार वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 04:16 PM2020-06-01T16:16:03+5:302020-06-01T16:16:13+5:30
लॉकडाउनच्या कालावधील शहर वाहतुक शाखेच्यावतीने विनाकारण फीरणाऱ्या १८ हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केली आहे.
अकोला : कोरोना या संसर्गजन्य विषानुला रोखण्यासाठी केंद्र शासनाने आतापर्यंत चार लॉकडाउन केले असून य लॉकडाउनच्या कालावधील शहर वाहतुक शाखेच्यावतीने विनाकारण फीरणाऱ्या १८ हजारांपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केली आहे. तर विनाकारण बाहेर फीरणाºया वाहनधारकांवर कारवाई करत दोन हजार वाहने जप्त करण्यात आली असून आतापर्यंत तब्बल 220 डबलसीट वाहन चालकांवर कारवाई केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात वाहतुक शाखेचे प्रमूख गजानन शेळके यांनी मोहिम तीव्र करीत वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्यकडून 15 लाख रुपयांपेक्षा अधिक दंड वसुल केला आहे. जिल्हा प्रशासनाने संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या दिलेल्या परवानगीचा गैरवापर करून अकोलकर रस्त्यावर गर्दी करतांना दिसत असल्याने ही कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली होती. जिल्हयातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची 600 च्यावर आहेत. मात्र अकोलेकरांना परिस्थीतीचे गांभीर्य नसल्याने त्यांनी आतातरी जागृत होणेगरजेचे आहे.शासनाच्या निर्देशांचे पालन न केल्यास आणखीही कठोर कारवाई यापुढे करण्यात येईल असे वाहतूक शाखा प्रमुख
गजानन शेळके यांनी सांगीतले.