फुकट प्रवास करणाऱ्या २६१ रेल्वे प्रवाशांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 02:16 PM2020-01-08T14:16:02+5:302020-01-08T14:16:26+5:30

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने विना तिकीट, अनुचित तिकीट प्रवास करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी अकोला रेल्वेस्थानकावर धडक मोहीम राबवली

Action on 261 freight train passengers | फुकट प्रवास करणाऱ्या २६१ रेल्वे प्रवाशांवर कारवाई

फुकट प्रवास करणाऱ्या २६१ रेल्वे प्रवाशांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला रेल्वेस्थानकावर भुसावळ विभागातील टिकीट तपासणी पथकाने मंगळवारी आॅन द स्पॉट मोहीम राबवली. या मोहिमेत २८ पथके सहभागी झाले होते. त्यांनी २६१ विना तिकीट प्रवास करणाºया फुकट्या प्रवाशांना पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख २२ हजार २७० रुपये दंड वसूल केला आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने विना तिकीट, अनुचित तिकीट प्रवास करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी अकोला रेल्वेस्थानकावर धडक मोहीम राबवली. ही मोहीम भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक आर.के. शर्मा आणि तिकीट तपासणी पथकाचे सहायक वरिष्ठ मंडळ प्रबंधक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली.
दरम्यान, अकोला रेल्वेस्थानकावर तिकीट तपासणी करताना २६१ प्रवासी अनियमित प्रवास करताना पकडल्या गेले.
त्यांच्याकडून १ लाख २२ हजार २७० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच विना तिकीट प्रवास करणाºयांविरुद्ध ५७ केसेस दाखल करण्यात आल्या. त्यांच्याकडून २८ हजार ३७० रुपये दंड आकारण्यात आला.
तसेच २०३ केसेस अनियमित प्रवास करणाºयांविरुद्ध दाखल करून त्यांच्याकडून ९२ हजार ८६० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच सामानाची बुकिंग न करणाºया एका प्रवासाकडून १ हजार ४० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच ज्या दोन प्रवाशांनी दंड भरण्यास असमर्थता दाखवली त्यांच्याविरुद्ध कलम १४४ नुसार खटला चालवण्यात आला आणि आणखी दोन प्रवासांनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांच्याविरुद्ध १४७ नुसार खटला दाखल करण्यात आला.
या मोहिमेत मुख्य टिकीट निरीक्षक तपासणी पथकाचे वाय.डी. पाठक, एटीएस स्कॉड, आयसीपी स्कॉड, सजग स्कॉड, ओडी स्टॉफ आणि इतर अन्य तिकीट तपासणी कर्मचारी उपस्थित होते. प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन यावेळी रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Action on 261 freight train passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.