अकोल्यात ५0 वीज चोरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 08:19 PM2017-09-29T20:19:24+5:302017-09-29T20:23:08+5:30

अकोला :  वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण  गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र  सातत्याने सुरु ठेवीत गुरुवारी २९  सप्टेंबर २0१७ रोजी अकोला  जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई  केली. यामध्ये अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण या  ितनही विभागामध्ये थेट वीजचोरी व विजेचा गैरवापर करणा-या   ५0 जणांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६  नुसार  कारवाई करण्यात आली.

Action in 50 power thieves in Akola | अकोल्यात ५0 वीज चोरांवर कारवाई

अकोल्यात ५0 वीज चोरांवर कारवाई

Next
ठळक मुद्देवीजेचा अनधिकृत वापराअकोला शहर, अकोट व ग्रामीण या तिनही विभागामध्ये कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :  वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण  गंभीर असून, याविरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र  सातत्याने सुरु ठेवीत गुरुवारी २९  सप्टेंबर २0१७ रोजी अकोला  जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई  केली. यामध्ये अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण या  ितनही विभागामध्ये थेट वीजचोरी व विजेचा गैरवापर करणा-या   ५0 जणांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६  नुसार  कारवाई करण्यात आली.
वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात  महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रादेशिक संचालक  भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या  निदेर्शानुसार  अधिक्षक अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृ त्वाखाली अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण  विभागामध्ये  अभियंते, अधिकारी कर्मचारी व जनमित्र  असलेल्या पथकाने या मोहिमेमध्ये सहभाग घेतला.
वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून व तारांवर आकडे टाकून थेट  वीजचोरी करणा-या ग्राहकांमध्ये अकोला शहर विभागअंतर्गत  ५, अकोट विभाग १0, तसेच अकोला ग्रामीण विभागांतर्गत २८  अशा एकूण ४३ ग्राहकांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या  कलम १३५ नुसार तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या  कारणाशिवाय दुस-या कारणासाठी वापर करीत असल्याचे  आढळून आलेल्या एकूण 0७ जणांवर भारतीय विद्युत  कायद्याच्या कलम १२६  नुसार कारवाई करण्यात आली.  संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना  देण्यात आल्या आहेत. यापूवीर्सुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये वीज  चोरीविरुद्ध राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये एकूण २९८  ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. वीजचोरी व गैरप्रकार  याविरोधात महावितरण गंभीर असून जिल्ह्यातील व शहरातील  जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्‍चित असून या पुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने,सामूहिकरीत्या आणि सा तत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे.  ग्राहकांनी  वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी  घेण्याचे आवाहन अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता दिलीप  दोडके यांनी केले आहे.

Web Title: Action in 50 power thieves in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.