अकोटात एकाच दिवशी ८५ वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:54 AM2020-12-04T04:54:38+5:302020-12-04T04:54:38+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ यांनी ...
जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ यांनी कर्मचारी पथकासह अचानक अकोट शहरातून बाहेर जाणाऱ्या रोडवर कारवाई सुरू केली. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांमध्ये खळबळ माजली. अकोट शहरातून बाहेर जाणाऱ्या अकोट ते हिवरखेड, अकोट ते दर्यापूर व अकोट ते अंजनगाव या रोडवर शांतता पसरली होती. सदर मोहिमेवर पोलीस निरीक्षक गजानन शेळके स्वतः हजर राहून लक्ष ठेवून होते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या १७ वाहने, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या ३८ व इतर ३० अशा एकूण ८५ वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या प्रवासी वाहन चालकांकडे वैध कागदपत्रे नव्हती, अशी वाहने पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आली.
फोटो: