अकोट शहरात ८६ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:30 AM2020-12-05T04:30:30+5:302020-12-05T04:30:30+5:30

अकोट शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या आदेशानुसार रस्ते अपघात कमी करण्यासाठी शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणा-या ...

Action on 86 vehicles in Akot city | अकोट शहरात ८६ वाहनांवर कारवाई

अकोट शहरात ८६ वाहनांवर कारवाई

Next

अकोट शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या आदेशानुसार रस्ते अपघात कमी करण्यासाठी शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणा-या २९ वाहनांवर तसेच वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, सीट बेल्ट न लावणे, विना लायसन वाहन चालविणे, बेदरकारपणे वाहन चालवणे आदी इतर कलमान्वये ५७ अशा एकूण ८६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या समक्ष अकोट पीएसआय जवरे, हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ शेंडे, सुनील नागे, आशीष नांदोकार, गणेश फोकमारे यांनी केली. (फोटो)

-----------------------------------

रस्ता नागरल्यामुळे शेतकरी त्रस्त!

अकोटः अकोट तालुक्यातील जुना मुंडगाव रस्ता नागरल्यामुळे अडगाव खुर्द-मुंडगाव रस्ता बंद झाला आहे. या परिसरात गावातील शेतकऱ्यांची १५० एकर शेती आहे. रस्त्यामुळे वादविवाद होत असून, शेतमाल आणण्यासाठी त्रास होत आहे. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना जयराम गवई, गजानन गवाई, दादाराव गवई, प्रकाश भड, रघुनाथ नेरकर, निरंजन गवई, तेजराव गवई उपस्थित होते.

Web Title: Action on 86 vehicles in Akot city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.