मास्क नसणाऱ्या २४ जणांवर कारवाई ; ४ हजार ८०० दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:18 AM2021-03-17T04:18:56+5:302021-03-17T04:18:56+5:30
मूर्तिजापूर : अकोला जिल्ह्यासह मूर्तिजापूर तालुक्यातील कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रादूर्भाव विचारात घेता प्रतिबंधक उपायांची अमलबजावणी करण्यात येत आहे. ...
मूर्तिजापूर : अकोला जिल्ह्यासह मूर्तिजापूर तालुक्यातील कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रादूर्भाव विचारात घेता प्रतिबंधक उपायांची अमलबजावणी करण्यात येत आहे. त्या पाश्र्वभूमीवर मास्क न लावता मुक्त संचार करणाऱ्या २४ लोकांवर कारवाई करुन त्यांच्या कडून ४ हजार ८०० रुपये दंड वसुल करण्यात आला.
शहरात शुक्रवार व मंगळवार, भरणारे दोन्ही बाजार बंद असताना तरीही नागरिकांची गर्दी होते, कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी कोरोना संक्रमणाला गतिमान करु शकते, ही भिती लक्षात घेऊन उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी हे दोन्ही आठवडी बाजार बंद ठेवण्याचा आदेश निर्गमित केला. तरीही मास्क न लावता बाजाराच्या दिवशी अनेक जण मुक्त संचार करतात मंगळवारी अशा २४ लोकांवर दंडात्मक कारवाई करून महसूल, पोलीस व पालिका प्रशासनाच्या पथकांनी मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनात ४ हजार ८००रूपये दंड वसूल केला.