लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ३६२ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 13:01 IST2020-08-09T13:01:10+5:302020-08-09T13:01:18+5:30
जिल्ह्यात लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करणाºया ३६२ जणांवर दंडात्मक कारवाई केली.

लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ३६२ जणांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना या तीव्र संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असतानाच अकोला पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये शनिवारी बाजारपेठ तसेच शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करणाºया ३६२ जणांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यासोबतच मास्क न लावणाºया २३0 जणांवर कारवाई केली असून, फिीजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया २३ आस्थापनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी प्रशासन तसेच पोलिसांकडून विनाकारण फिरणाºयावर कारवाईसाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात मोहीम राबविण्यात आली. शहरातील ठाणेदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ही मोहीम राबविताना कारवाई करीत अनेकांना दंड ठोठावला. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार घराबाहेर पडल्यानंतर मास्क न वापरणाºया २३0 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करणाºया ३६२ जणांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यासोबतच मास्क न लावणाºया २३0 जणांवर कारवाई केली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया २३ आस्थापनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्याकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मास्क किंवा फेस शिल्ड वापरणे गरजेचे असून, ते न वापरल्यास पोलिसांकडून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी पोलिसांचे पथकच कामाला लागले असून, विना मास्क फिरणारे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस प्रशासनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.