मास्क न वापरणाऱ्या ७२ जणांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 04:39 PM2020-06-06T16:39:34+5:302020-06-06T16:39:41+5:30
बार्शीटाकळी पोलीस, नगरपंचायत तसेच तहसील विभागाच्या वतीने एक संयुक्त मोहीम राबवित मास्क न वापरणारे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया ७२ जणांविरुद्ध शनिवारी कारवाई करण्यात आली.
अकोला : कोरोना संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत असतानाच चार दिवसांपूर्वी बार्शीटाकळीमध्ये कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर बार्शीटाकळी पोलीस, नगरपंचायत तसेच तहसील विभागाच्या वतीने एक संयुक्त मोहीम राबवित मास्क न वापरणारे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया ७२ जणांविरुद्ध शनिवारी कारवाई करण्यात आली.
बार्शीटाकळी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता बार्शीटाकळी पोलीस, तहसील प्रशासन तसेच नगरपंचायतच्या वतीने खबरदारी म्हणून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तिरुपती राणे, तहसीलदार गजानन हामंद तसेच नगरपंचायतच्या वतीने एक मोहीम सुरू करून तोंडाला मास्क न बांधणाºया तसेच दुकानांवर व शासकीय कार्यालयामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया व्यक्तींवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला. शनिवारी दिवसभर कारवाई केल्यानंतर शहरातील ७२ जणांविरुद्ध मास्क न वापरणे तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºयांवर दंडात्मक कारवाई करून १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती ठाणेदार तिरुपती राणे यांनी दिली.
बार्शीटाकळी शहरात कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, नगरपंचायत तसेच तहसील प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करून कोरोनाला रोखण्यासाठी मदत करावी.
- तिरुपती राणे,
ठाणेदार,
पोलीस ठाणे, बार्शीटाकळी.