अकोल्यात आॅटोचालकांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2017 02:46 PM2017-07-06T14:46:44+5:302017-07-06T14:46:44+5:30

शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Action against autocrats in Akola | अकोल्यात आॅटोचालकांविरुद्ध कारवाई

अकोल्यात आॅटोचालकांविरुद्ध कारवाई

Next

अकोला: शहरवाहतूक शाखेने बेलगाम ऑटोंधारकांवर गुरुवारी  दंडात्मक कारवाई केली. या वेळी २०० ऑटोधारकांना  दोन  हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात आला. हि  कारवाई शहर  वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात  आली.
अकोला शहरात परवानाधारक ऑटोंपेक्षा विनापरवाना व ग्रामीण परमिट च्या  ऑटोंची संख्या अधिक आहे. अशा ऑटोधारकांची तपासणी मोहीम गुरुवारी  वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक विलास पाटील  यांनी राबवली. या वेळी विना परवाना  ऑटो , त्यांच्याकडे कागदपत्रांची पूतर्ता नसेल अशा ऑटोवर  कारवाई करण्यात आली . तर अवैध प्रवासी वाहतूक करणार्या ऑटों आणि ग्रामीण परवानाधारक ऑटोधारकांना दोन हजार रुपये दंड आकारण्यात आला. ही कारवाई दिवसभर सुरु असल्यामुळे ऑटोधारकांनी पोलिसांची धास्ती घेतली होती. बेरोजगारीमुळे अनेक युवकांनी ऑटो चालवण्याचा व्यवसाय स्वीकारला आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी, अशी पोलिसांचीही इच्छा नसते. मात्र अनेकवेळा ऑटोधारकांविषयीच्या तक्रारी प्राप्त होतात त्यामुळे  पोलिसांना नाइलाजास्तव कारवाई करावी लागते. रस्त्याच्या मधोमध ऑटो थांबवून , वाहतुकीचा खोळंबा निर्माण करण्यास ऑटोचालक अग्रेसर राहत असल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाया केल्या जातात.

Web Title: Action against autocrats in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.