मोठ्या आवाजात फटाके फोडणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:32 AM2020-12-14T04:32:13+5:302020-12-14T04:32:13+5:30
बुलेटच्या सायलेन्सरमध्ये काही बदल केल्यानंतर बुलेट जाेरात चालवून त्यानंतर रेस केली की फटाका फुटल्यासारखा आवाज येतो. रात्रीच्या सुमारास अशा ...
बुलेटच्या सायलेन्सरमध्ये काही बदल केल्यानंतर बुलेट जाेरात चालवून त्यानंतर रेस केली की फटाका फुटल्यासारखा आवाज येतो. रात्रीच्या सुमारास अशा बुलेट चालकांचा धुमाकुळ सुरू असताे. त्यामुळे आजारी माणसे व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाहतूक शाखेकडे करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना काही ज्येष्ठ नागरिकांनी फोनद्वारे तोंडी तक्रार केल्यानंतर गंभीर दखल घेऊन त्यांनी अशा वाहन चालकांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी ५ बुलेट चालकांवर कारवाई करीत वाहने जप्त करण्यात आले आहेत. शहरातील भौगोलिक परिस्थितीमुळे व रस्त्याचे कामकाज सुरू असल्याने अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यातच वाहतूक पोलिसांची धावपळ होते. तरुणांनी जबाबदार नागरिकांचे कर्तव्य म्हणून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही ह्याची जाणीव ठेवून वाहन वापरावे असे आवाहन पाेलिसांनी केले आहे. तसेच फटाके फोडणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध कठाेर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पाेलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिली