दारूची अवैधरीत्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:12 AM2020-12-07T04:12:51+5:302020-12-07T04:12:51+5:30
खडकी परिसरात अवैध दारू विक्री करणारा इसम भारत सुरेश गरभे रा. खडकी मलकापूर याच्या घरातून देशी ...
खडकी परिसरात अवैध दारू विक्री करणारा इसम भारत सुरेश गरभे रा. खडकी मलकापूर याच्या घरातून देशी व विदेशी दारूची अवैधरित्या विक्री करण्यात येत असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून सदर इसमाच्या घराची झडती घेऊन ११४ देशी दारूच्या बाटल्या किंमत ६ हजार ८४० रुपये व इतर मुद्देमाल असा एकूण ७ हजार रुपयांचा साठा जप्त केला. त्यानंतर याच परिसरात त्याच्याच बाजूला असलेल्या एका पानटपरीच्या चालकाकडूनही दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या दाेघांविरुध्द खदान पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.