अतिक्रमणाच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:24 AM2017-10-30T01:24:09+5:302017-10-30T01:24:42+5:30
अकोला : गांधी रोडवरील महापालिकेसमोर असलेल्या कॉम्प्लेक्सच्या मागे अतिक्रमणाच्या कारणावरून दोन गट आपसात भिडल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेच्या माहितीला पोलिसांनी तत्काळ प्रतिसाद दिल्याने प्रकरण लगेच आपसात मिटविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्हय़ाची मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोडवर दुकान लावण्याच्या जागेवरून तसेच अतिक्रमणाच्या जागेवरून रोजच किरकोळ वाद निर्माण होतात. रविवारीही अशाच प्रकारे वाद निर्माण झाल्यानंतर एका गटातील युवकांनी तलवार काढल्याची चर्चा शहरभर पसरली, एवढेच नव्हे तर, तलवार व पाइपने दोन गटात हाणामारी सुरू असल्याची अफवा पसरल्याने बाजारपेठेत धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे व कर्मचारी तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. मात्र, परिस्थिती नियंत्रणात होती. किरकोळ अतिक्रमणाच्या वादातून दोन गट वाद घालत असल्याचे पुढे आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील युवकांची समजूत काढून वाद आपसात मिटविण्यात आला.