अकोल्यात सुरू होणार गुड मॉर्निंंग पथकाची कारवाई
By admin | Published: March 5, 2017 01:42 AM2017-03-05T01:42:35+5:302017-03-05T01:42:35+5:30
ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागाला हगणदरीमुक्त करण्याचे महापालिकांना उद्दिष्ट आहे.
अकोला, दि. ४- उघड्यावर शौचास बसणार्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे गुड मॉर्निंंग पथक पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी आरोग्य निरीक्षकांवर ही जबाबदारी सोपविली असून, संबंधित नागरिकांनी न जुमानल्यास त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी शनिवारी दिले.
उघड्यावर शौच करण्याच्या प्रकारामुळे जीवघेण्या साथीच्या आजारांचा झपाट्याने फैलाव होतो. केंद्र शासनाच्या ह्यस्वच्छ भारतह्ण अभियानच्या धर्तीवर राज्य शासनाने ह्यस्वच्छ महाराष्ट्रह्णअभियान सुरू केले असून, ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागाला हगणदरीमुक्त करण्याचे महापालिकांना उद्दिष्ट आहे. घरी वैयक्तिक शौचालय नसणार्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बांधून देण्याचे काम मनपा स्तरावर सुरू आहे. मनपाच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या बैठकीत उघड्यावर शौचास बसणार्या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य निरीक्षकांना देण्यात आले. वेळप्रसंगी संबंधितांविरुद्ध फौजदारी तक्रार नोंदविण्याची प्रशासनाची सूचना आहे.
शौचालय बांधले तरीही..
मनपाला पहिल्या टप्प्यात १४ कोटी रुपयांतून शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट होते. आरोग्य निरीक्षकांनी घरोघरी जाऊन सर्व्हे केल्यानंतर गरजू व्यक्तींना शौचालय बांधून दिले. तरीदेखील संबंधित परिसरातील नागरिक उघड्यावर शौचाला बसत असल्याचे चित्र आहे.