हेल्मेटविना वाहनधारकांवर कारवाई
By admin | Published: October 8, 2015 01:41 AM2015-10-08T01:41:12+5:302015-10-08T01:41:12+5:30
अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ९२ वाहनधारकांकडून ९ हजारांवर दंड वसूल.
अकोला: जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या वाहनधारकांविरुद्ध बुधवारी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ९२ वाहनधारकांकडून ९ हजार २00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या आदेशानुसार, गत महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कार्यालय परिसरात येणार्या वाहनधारक नागरिकांसाठीदेखील हेल्मेटचा वापर करणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळी हेल्मेटविना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करणार्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांसह नागरिकांविरुद्ध शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्मेटविना आलेल्या कर्मचार्यांसह वाहनधारक नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर वाहतूक पोलिसांनी थांबूवन प्रत्येकी १00 रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये ९२ वाहनधारकांकडून ९ हजार २00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) उदय राजपूत यांच्या उपस्थितीत वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली.