अवैध सावकारी करणा-यावर कारवाई
By admin | Published: September 18, 2014 12:48 AM2014-09-18T00:48:27+5:302014-09-18T00:48:27+5:30
खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे अवैध सावकारी करणा-यावर उपनिबंधक पथकाचा छापा.
बुलडाणा : खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील अवैध सावकरी व्यवसाय करणार्या पंढरी तुकाराम पांढरे यांच्या घरावर जिल्हा उपनिबंधक पथकाने छापा टाकून आक्षेपार्ह दास्ताऐवज जप्त केले. ही कारवाई १६ सप्टेंबर रोजी करण्यात आली. पंढरी तुकाराम पांढरे हे अवैध सावकारी व्यवसाय करतात, अशी तक्रारी कैलास पांढरे यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, खामगाव यांच्याकडे केली होती. त्यानुसार सहाय्यक निबंधक यांनी चौकशी करुन जिल्हा उपनिबंधक बुलडाणा यांच्याकडे अहवाल सादर केला.
जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्या मार्गदर्शनात खामगाव येथील सहाय्यक निबंधक जी.पी. साबळे आणि पथकाने १६ सप्टेंबर रोजी पंढरी तुकाराम पांढरे यांच्या लाखनवाडा येथील राहत्या घरावर छापा टाकला. सदर छाप्यात आक्षेपार्ह दस्तऐवज आढळून आले. हे सर्व दस्ताऐवज जप्त करण्यात आले. पंढरी पांढरे यांच्यावर महाराष्ट्र सावकरी अधिनियम, २0१४ मधील तरतुदीनुसार कायदेशिर कारवाई करण्यात आली.