दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई

By admin | Published: April 5, 2017 07:56 PM2017-04-05T19:56:56+5:302017-04-05T19:56:56+5:30

अकोला - देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले असून, बुधवारी अशाच प्रकारे दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोघांवर खदान पोलिसांनी कारवाई केली.

Action on the illicit traffic of two liquor workers | दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई

दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई

Next

अकोला - राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या वाईन बार, वाईन शॉप आणि देशी-विदेशी दारूच्या दुकानांवर बंदी घालण्यात आल्यानंतर देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले असून, बुधवारी अशाच प्रकारे दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोघांवर खदान पोलिसांनी कारवाई केली.
खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतून विकास अर्जुन टमटमकर आणि त्याचा साथीदार संतोष अक्कुसिंह ठाकूर हे दोघे देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. यावरून खदान पोलिसांनी या दोघांवर पाळत ठेवून, ते देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत असताना त्यांना खदान परिसरात पकडले. दोघांकडून २६ हजार ६८० रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Action on the illicit traffic of two liquor workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.