'शॉप अॅक्ट' परवान्याच्या नावाखाली लुटणाऱ्यांवर आता कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 04:08 PM2018-11-26T16:08:13+5:302018-11-26T16:08:21+5:30
अकोला : शॉप अॅक्ट परवान्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लुटल्या जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणल्यानंतर इन्कम टॅक्स चौकातील शॉप अॅक्ट कार्यालयाने त्याची गंभीर दखल घेतली.
अकोला : शॉप अॅक्ट परवान्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लुटल्या जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणल्यानंतर इन्कम टॅक्स चौकातील शॉप अॅक्ट कार्यालयाने त्याची गंभीर दखल घेतली. लूट करणाºया एजंटविरुद्ध कारवाई करण्यासाठी मोहीम राबविली जाणार असल्याचे शॉप अॅक्ट कार्यालयाचे निरीक्षक जोशी यांनी सांगितले.
शॉप अॅक्ट परवाना मिळविण्याची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन झाली आहे. आॅनलाइन परवानाचे शुल्क केवळ २३ रुपये असताना, ग्राहकांकडून सातशे ते पंधराशे रुपये घेतले जातात. सायबर कॅफे, सर्व्हिस सेंटर आणि काही एजंटचा हा गोरखधंदा गत काही महिन्यांपासून जोरात आहे. अनेकांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आणि शॉप अॅक्ट निरीक्षक कार्यालयाकडे नोंदविली; मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. दरम्यान, या वृत्ताला ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणले. त्यामुळे अनेकांनी लूट होत असल्याच्या बाबीला दुजोरा दिला. त्यामुळे शॉप अॅक्ट परवाना गोरक्षण मार्ग कार्यालयाचे निरीक्षक जोशी यांनी गंभीर दखल घेत याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याचे सांगितले. आता लूट थांबते की तशीच सुरू राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
जिल्हाधिकाºयांनी आढावा घेण्याची गरज!
परवाना देण्याच्या नावाखाली चक्क २३ रुपये शुल्काऐवजी पंधराशे रुपये घेतल्या जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. जिल्हाधिकारी यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन आढावा घेण्याची गरज आहे, असे फसवणूक झालेल्यांकडून बोलल्या जात आहे. त्यामुळे शॉप अॅक्ट निरीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची वेळ आली आहे.