शंभर अवैध नळधारकांवर कारवाई

By admin | Published: March 5, 2016 02:47 AM2016-03-05T02:47:06+5:302016-03-05T02:47:06+5:30

पाण्याचा अपव्यय करणा-या सुमारे १00 नळ जोडणीधारकांवर जलप्रदाय विभागाने दंडात्मक कारवाई केली.

Action on one hundred illegal land holders | शंभर अवैध नळधारकांवर कारवाई

शंभर अवैध नळधारकांवर कारवाई

Next

अकोला: रामनगरस्थित म्हाडा कॉलनीत पाण्याचा अपव्यय करणार्‍या सुमारे १00 नळ जोडणीधारकांवर शुक्रवारी मनपाच्या जलप्रदाय विभागाने दंडात्मक कारवाई केली. येत्या दिवसांत अवैध नळ शोध मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत आहेत.
शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळावे यासाठी महापालिकेचा जलप्रदाय विभाग प्रयत्नरत आहे. शहरातील मालमत्तांच्या तुलनेत वैध नळ कनेक्शनधारकांची संख्या केवळ २५ ते २८ हजारपर्यंंत असल्याने जलप्रदाय विभागाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अशा नळ कनेक्शनधारकांचा शोध घेऊन त्यांची अधिकृत नोंदणी करण्याची मोहीम मनपाने हाती घेतली आहे. दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर जलप्रदाय विभागाने अवैध नळ कनेक्शनची शोध मोहीम पुन्हा सुरू केली.अनिकट परिसरात सार्वजनिक नळाद्वारे मोठय़ा प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली. रामनगरस्थित म्हाडा कॉलनीतील गाळेधारकांच्या नळांची तपासणी केली असता, नळाद्वारे पाण्याचा प्रचंड अपव्यय आढळून आल्याप्रकरणी तब्बल १00 नळ जोडणीधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Web Title: Action on one hundred illegal land holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.