बियाण्यांची उगवण न झाल्यास उत्पादक कंपन्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:15 AM2021-06-04T04:15:44+5:302021-06-04T04:15:44+5:30
जिल्ह्यात काही ठिकाणी बियाणे विक्रेते कृषी सेवा केंद्र चालक व शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे विक्री करताना उगवण चाचणी करू, याबाबत ...
जिल्ह्यात काही ठिकाणी बियाणे विक्रेते कृषी सेवा केंद्र चालक व शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे विक्री करताना उगवण चाचणी करू, याबाबत शिक्का मारून स्वाक्षरी घेऊन विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याबाबत पालकमंत्री कडू यांनी बी-बियाणे खते उपलब्धता याबाबत आढावा घेताना हे निर्देश दिले. यावेळी आ. नितीन देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के. व्ही. खोत, जिल्हा कृषी विकास अधिकारी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात अशा पद्धतीने शेतकऱ्यांना बियाणे विक्री होत असेल तर संबंधित उत्पादक कंपनीला जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असे सुस्पष्ट निर्देश कडू यांनी यावेळी दिले.