अकोला जिल्ह्यातील ९७५ प्राथमिक शाळांमध्ये कृती कार्यक्रम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:19 PM2018-05-28T14:19:06+5:302018-05-28T14:19:06+5:30
अकोला: प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
अकोला: प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यंदाही अकोला जिल्ह्यातील ९७५ प्राथमिक शाळांमध्ये अध्ययन स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांचा गणित व भाषेवर भर देण्यात येणार आाहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, सर्व प्राथमिक शाळांतील शंभर टक्के विद्यार्थी प्रगत झाले पाहिजेत, या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत कृती कार्यक्रम टप्प्या-टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचा भाषा व गणित विषयातील अध्ययन स्तर ठरविण्याचा कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कृती कार्यक्रमांतर्गत अध्ययन स्तर क्रमांक-१ राबविण्यात आला. १ ते १५ मार्चदरम्यान अध्ययन स्तराचा दुसरा टप्पा राबविण्यात आला. अध्ययन स्तराचा तिसरा टप्पा १५ ते ३१ मार्चपर्यंत राबविण्यात आला आणि अंतिम टप्पा १ ते १५ एप्रिलदरम्यान राबविण्यात आला होता. यामध्ये प्राथमिक विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरात सुधारणा झाल्याचे दिसून आले. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर पुन्हा प्राथमिक शाळांमध्ये अध्ययन स्तर वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग राबविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)