विनातिकीट प्रवास करणा-या ४१0 जणांवर कारवाई
By admin | Published: March 27, 2017 02:55 AM2017-03-27T02:55:32+5:302017-03-27T02:55:32+5:30
रेल्वेची लुबाडणूक करणार्या प्रवाशांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली.
अकोला, दि. २६- मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने विभागात विनातिकीट प्रवास करणार्या, तसेच अन्य मार्गाने रेल्वेची लुबाडणूक करणार्या प्रवाशांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत रेल्वे प्रशासनाने ४१0 जणांवर कारवाई करून, १ लाख ६७ हजार ३१५ रुपये महसूल दंड म्हणून वसूल केला. यापूर्वी १९ जानेवारी व ९ फेब्रुवारी रोजी अशाच पद्धतीने विभागात राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत, मध्य रेल्वे प्रशासनाने ८७२ जणांवर कारवाई करून, ३ लाख ३६ हजार २२0 रुपये महसूल दंड म्हणून वसूल केला होता.
या मोहिमेत ११0३९ महाराष्ट्र एक्स्प्रेस, १२८५९ गीतांजली एक्स्प्रेस, १२१६५ वाराणसी एक्स्प्रेस, ५११८१ देवळाली-भुसावळ, ५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर, १२७७९ गोवा एक्स्प्रेससह अकोला मार्गे जाणार्या अन्य काही एक्स्प्रेस गाडीतील प्रवाशांची तिकीट तपासणी करण्यात आली.