हेल्मेट न घालणाऱ्या ३५० दुचाकीचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:13 AM2020-11-23T11:13:24+5:302020-11-23T11:13:35+5:30
Akola Traffic Police News मोहीम राबवून ३५० च्या वर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
अकोला : जिल्ह्यात घडणाऱ्या रस्ते अपघातात हकनाक जीव गमविणाऱ्यांचा चढता आलेख पाहता मागील १५ दिवसांपासून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशावरून शहरालगतच्या राष्ट्रीय व राज्य मार्गावर हेल्मेट सक्ती करून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीचालकांवर धडक मोहीम राबवून ३५० च्या वर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.
शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसह माेहीम राबिवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या माेहिमेचा उद्देश दंडात्मक कारवाई करणे हा नसून, रस्ते अपघातात डोक्याला इजा होऊन होणारे मृत्यू कमी करणे हा उद्देश आहे. दुचाकीचालकांना हेल्मेट घालण्याची सवय लागावी हा मुख्य उद्देश असल्याने नागरिकांनी हेल्मेट घालून दुचाकी चालवावी, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे. अकाेलेकरांनी या माेहिमेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले आहे.