कागदपत्रे न बाळगणाऱ्या ५०० वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:12 AM2020-12-07T04:12:49+5:302020-12-07T04:12:49+5:30
अकाेला : शहर वाहतूक शाखेच्यावतीने राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत कागदपत्रे न बाळगणाऱ्या ५०० च्यावर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. ही ...
अकाेला : शहर वाहतूक शाखेच्यावतीने राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत कागदपत्रे न बाळगणाऱ्या ५०० च्यावर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. ही माेहीम सुरूच राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी स्पष्ट केले.
शहरासह जिल्ह्यात दुचाकीवर येऊन गुन्हे करणाऱ्या तसेच चोरीच्या दुचाकींचा गुन्ह्यात वापर करणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या निर्देशावरून अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी गत एक महिन्यापासून धडक कारवाई करीत सुमारे ५०० पेक्षा अधिक वाहनचालकांवर कारवाई केली. दुचाकी चालविताना वैध कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्या किंवा अधिकृत मान्यता प्राप्त ॲपमध्ये वैध कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत न दाखविल्यास अशा दुचाकी वाहतूक शाखेच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहेत. वैध कागदपत्रे दाखविल्यानंतर दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात येत आहे. अशा प्रकारची कारवाई टाळण्यासाठी सर्व दुचाकीचालकांनी वाहनांचे वैध कागदपत्रे जवळ बाळगावी किंवा मान्यताप्राप्त ॲप्स जसे की डीजी लॉकरसारख्या ॲप्समध्ये कागदपत्रांची स्कॅन कॉपी करून ठेवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले आहे.