अकोट न.प.ने केली जप्तीची कारवाई
By admin | Published: February 24, 2017 02:46 AM2017-02-24T02:46:29+5:302017-02-24T02:46:29+5:30
अकोट शहरातील थकीत मालमत्ताधारकांवर मुख्य अधिकारी गीता ठाकरे यांनी करवसुली अंतर्गत धडक कारवाई सुरू
अकोट: अकोट शहरातील थकीत मालमत्ताधारकांवर मुख्य अधिकारी गीता ठाकरे यांनी करवसुली अंतर्गत धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाई अंतर्गत शहरातील प्रतिष्ठित व्यापारी ईश्वरलाल जेसवानी यांच्या मालमत्तेला सील लावून मालमत्ता जप्त करून घेतली. शहरातील इतरही मालमत्ताधारकांकडे कर वसुली पथक गेले असता सर्व मालमत्ताधारकानी लगेच थकीत कराचा भरणा करून पुढील कारवाई टाळली. मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्या निर्देशानुसार पुढील ३१ मार्चपर्यंत सदर कारवाई मोहीम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी थकीत मालमत्ताधारकांना बजावले व त्वरित कराचा भरणा करून जप्तीसारखी अप्रिय कारवाई टाळण्याचे आव्हान केले. सदर कारवाईकरिता कर वसुली पथकात कर अधीक्षक गौरव लोंदे, कार्यालय पर्यवेक्षक एम. ए. जोशी, स्थापत्य अभियंता स्नेहल बोंमकानटीवार, रोशन कुमरे, जायेद खा, विजय सारवान, ज्ञानदेव मरकाम, विजय रताळे, मनोज पिंपळे, दत्तात्रय सोळंके व इतर कर्मचारी उपस्थित होते.