गावठी पिस्तूलसह आराेपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाइ
By आशीष गावंडे | Published: June 15, 2024 09:57 PM2024-06-15T21:57:29+5:302024-06-15T21:57:41+5:30
आरोपी विरूध्द आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करीत त्याला उरळ पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अकाेला: बकरी इद सणाच्या पृष्ठभूमिवर शहरासह जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाइ करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांची यंत्रणा सरसावली आहे. शनिवारी पेट्राेलिंगवर असलेल्या पथकाला उरळ हद्दीतील कवठा गावालगत एक इसम विदेशी बनावटीची गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने सदर इसमाला पिस्तूलसह ताब्यात घेतले.
रघूविर तेलसिंग चौहाण (वय ३०, रा.फुकटपुरा जलाराम मंदीर जवळ जळगाव जामोद जि. बुलढाणा)असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे. येत्या १७ जून राेजी बकरी इद असल्यामुळे ‘एलसीबी’चे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या निर्देशानुसार ‘पीएसआय’गोपाल जाधव व त्यांचे पथक बाळापूर उपविभागात पेट्रोलींग करीत हाेते. यादरम्यान, त्यांना उरळ पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील कवठा गावाजवळ एक इसम गावठी पिस्तूल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. या पथकाने सापळा रचून रघूविर तेलसिंग चौहाण याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक विदेशी बनावटीची गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतूस, वाहन असा एकूण ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी विरूध्द आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करीत त्याला उरळ पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाइ जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, ‘एलसीबी’प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात ‘पीएसआय’गोपाल जाधव, अंमलदार रविंद्र खंडारे, वसीम शेख, भिमराव दिपके यांनी केली.