तीन जुगा-यांवर कारवाई; १५ जणांना अटक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:31 AM2020-12-05T04:31:03+5:302020-12-05T04:31:03+5:30
प्राप्त माहितीनुसार, शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या आंबेडकर नगर भागात गौतम नामदेव कंकाल याच्या वरली अड्ड्यावर छापेमारी केली. ...
प्राप्त माहितीनुसार, शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या आंबेडकर नगर भागात गौतम नामदेव कंकाल याच्या वरली अड्ड्यावर छापेमारी केली. यावेळी गजानन ओंकार घ्यारे रा. आंबेडकर नगर, चंद्रकांत बालमोहन वर्धवेकर रा. हरिहरपेठ या दोघांना अटक करून १ हजार ६३० रुपये जप्त केले. तसेच गवळीपुरा जाम मोहोल्ला परिसरात चालणाऱ्या वरली जुगारवर कारवाई करत अनिल मधुकर बाबुडकर, चानद मदार परसुवाले, अजय गजानन पराते, शेख चांद शेख हिदू गोरवे, सादिक अली फय्याज अली, अय्याज खान रा. बैदपुरा यांना अटक करून ५ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर बाभुळगाव शेत शिवारात छापेमारी करून पाच जुगाऱ्याना रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून रोख ३ हजार ५०० रुपये, २२ हजारांचे तीन मोबाइल, ५० हजाराच्या २ मोटरसायकली असा एकूण ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.