सदोष रीडिंग घेणाऱ्या एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:19 AM2017-07-19T01:19:50+5:302017-07-19T01:19:50+5:30

ग्राहकांना अचूक व वेळेत बिल द्या : प्रादेशिक संचालक यांचे निर्देश

Action on two employees of a faulty reading agency | सदोष रीडिंग घेणाऱ्या एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

सदोष रीडिंग घेणाऱ्या एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: वीज ग्राहकांचे अचूक मीटर रीडिंग घेऊन वेळेत बिल देण्याकरिता महावितरण प्रयत्नरत असून, मात्र फेरतपासणी दरम्यान अकोला ग्रामीण विभागांतर्गत ग्राहकांच्या वीज मीटरचे सदोष रीडिंग घेणाऱ्या एजन्सीच्या दोन कर्मच्याऱ्यांविरुद्ध कारवाईचे निर्देश नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सोमवारी दिले. अकोला शहर व ग्रामीण विभागाची आज गोरक्षण मार्ग व विद्युत भवन कार्यालय येथे त्यांनी वेगवेगळी आढावा बैठक घेतली.
ग्राहकांना अचूक व योग्य वीज देयक देण्यासाठी महावितरणने मोबाइल अ‍ॅप्सद्वारे वीज मीटर रीडिंगची प्रणाली विकसित केल्यामुळे रीडिंगची पद्धत सोपी झाली आहे; मात्र रीडिंग एजन्सीकडील कर्मचारी मात्र सदोष रीडिंग घेताना निदर्शनास येत असल्यामुळे महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्याकडून दररोज ५ टक्के मीटर रीडिंगची फेरतपासणी राज्यभर सुरू आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले. सोबतच मीटर रीडिंग एजन्सीच्या कार्यरत कर्मचाऱ्यांचे आधार क्रमांक यंत्रणेमध्ये जोडले असल्यामुळे भविष्यामध्ये सदर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रात महावितरणमध्ये काम करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सदोष मीटर रीडिंगमुळे महावितरणच्या महसुलाबरोबरच ग्राहकांनी नाहक त्रास सहन करावा लागतो, तरी यासंदर्भात अभियंते व कर्मचाऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
महावितरणने ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा उपलब्ध करून दिली आहे. याचा लाभ घेण्यासाठी सर्व ग्राहकांचे मोबाइल क्रमांक नोंदणी तातडीने करून घ्यावी, तसेच कंपनीची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या वीज बिलाची वसुली तत्परतेने करून थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याचे निर्देशही प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी यावेळी दिले.
यावेळी अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, कार्यकारी अभियंते धर्मेंद्र मानकर व देवेंद्र उंबरकर तसेच सर्व उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते व वित्त व लेखा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Action on two employees of a faulty reading agency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.