विनापरवानगी वीटभट्टय़ांवर कारवाई

By admin | Published: December 6, 2014 12:04 AM2014-12-06T00:04:25+5:302014-12-06T00:04:25+5:30

वीटभट्टीमालकांकडून गौण खनिज चोरी व महसूल बुडविल्याबाबत तब्बल साडेचार लाखांचा दंड वसूल.

Action on unauthorized bribe | विनापरवानगी वीटभट्टय़ांवर कारवाई

विनापरवानगी वीटभट्टय़ांवर कारवाई

Next

बाळापूर (अकोला) : शहर व परिसरात कोणत्याही परवानगीशिवाय सुरू असलेल्या सहा वीटभट्टय़ांवर उ पविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी कारवाई करून, वीटभट्टीमालकांकडून गौण खनिज चोरी व महसूल बुडविल्याबाबत तब्बल साडेचार लाखांचा दंड वसूल केला.
बाळापूर शहर व परिसरात मोठय़ा प्रमाणात वीटभट्टय़ा सुरू आहेत. या भट्टय़ांच्या मालकांकडून मोठय़ा प्रमाणात अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन होत आहे. याची गंभीर दखल घेत उ पविभागीय अधिकारी राम लठाड, तहसीलदार समाधान सोळंके, नायब तहसीलदार एस. पी. किर्दक, मंडळ अधिकारी एच. डी. देशमुख, तलाठी गजानन भागवत, लोहार आदींनी दोन दिवस परिसरातील वीटभट्टय़ांवर कारवाई केली. गौण खनिजाची चोरी तसेच शासनाचा महसूल बुडविल्याप्रकरणी परिसरातील सहा वीटभट्टय़ांच्या मालकांकडून ४ लाख ५0 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच वीटभट्टय़ांवरील कच्च्या विटा जेसीबीद्वारे नष्ट करण्यात आल्या. या कारवाईमुळे विनापरवानगी वीटभट्टय़ा चालविणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Action on unauthorized bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.