अनधिकृत इमारतींवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:15 AM2021-07-18T04:15:08+5:302021-07-18T04:15:08+5:30
विकास कामांच्या प्रस्तावासाठी कंत्राटदारांची लगबग अकाेला: महापालिका प्रशासनाला सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजना, लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती याेजना व ...
विकास कामांच्या प्रस्तावासाठी कंत्राटदारांची लगबग
अकाेला: महापालिका प्रशासनाला सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजना, लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती याेजना व दलितेतर याेजनेंतर्गत काेट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. यापैकी २७ काेटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले असून, उर्वरित २३ काेटी रुपयांतून प्रस्ताव तयार करण्यासाठी मनपात कंत्राटदारांची लगबग सुरू असल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले.
जुन्या विद्युत साहित्याचा लिलाव
अकाेला: शहरातील सर्व प्रमुख मार्ग, प्रभागात ठिकठिकाणी प्रकाशमान एलईडी पथदिव्यांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे जुने सीएफएल लाइट व इतर विद्युत साहित्याचा लिलाव करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. प्रशासनाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने हिरवी झेंडी दिली आहे. लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे.
टिळक, नेकलेस रस्त्यावर एलईडी
अकाेला: मनपाला सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजनेतून प्राप्त २४ लक्ष रुपये निधीतून शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या टिळक व नेकलेस मार्गावर एलईडी पथदिवे उभारल्या जाणार आहेत. मनपाच्या विद्युत विभागाने निविदा प्रकाशित केली. प्राप्त निविदेच्या अनुषंगाने कंत्राटदाराला लवकरच कार्यादेश दिला जाणार आहे. त्यानंतर, या दाेन्ही मार्गांवरील दुभाजकांमध्ये लाइट उभारल्या जातील.