पीक विम्याची रक्कम १५ जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा! - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 02:28 PM2018-05-26T14:28:09+5:302018-05-26T14:28:09+5:30
अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात १५ जूनपूर्वी पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात १५ जूनपूर्वी पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित कृषीविषयक जिल्ह्यातील विविध कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अकोला जिल्ह्यात २४ मे ते ७ जून दरम्यान ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधरवडा राबविण्यात येत असून, ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, उप-जिल्हाधिकारी अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, ‘आत्मा’चे प्रकल्प अधिकारी बावीस्कर, ‘केम’च्या जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक माधुरी सरोदे, अकोल्याचे उप-विभागीय अधिकारी संजय खडसे यांच्यासह जिल्ह्यातील उप-विभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी व विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. सन २०१७ च्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ४७ हजार ५६६ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यासाठी ९ कोटी ५८ लाख रुपये विमा हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली होती. पीक विमा काढलेल्या शेतकºयांसाठी पीक नुकसान भरपाईपोटी ११८ कोटी ३९ लाख रुपये विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली. मंजूर करण्यात आलेली पीक विम्याची रक्कम १५ जूनपूर्वी जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यात उन्नत शेती-समृद्ध शेतकरी पंधरवडा राबविण्यात येत असून, या मोहिमेत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया कृषी विकास व शेतकरी कल्याणाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार करण्याच्या सूचना देत, योजनांचा जिल्ह्यातील शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले. उन्नत शेती-समृद्ध शेतकरी पंधरवड्यात जिल्ह्यात ७३१ सभांचे आयोजन करण्यात आले असून, कृषी तज्ज्ञ, शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या मोहिमेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. हवामान आधारित फळपीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा व कृषी समृद्धी समन्वित कृषी विकास प्रकल्प अंतर्गत कामांचा आढावादेखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला.
अपघात विम्याचे प्रलंबितप्रस्ताव मार्गी लावा!
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी या बैठकीत दिले.