आणखी ४९ पॉझिटिव्ह रुग्णांची भर; एकूण रुग्णसंख्या ५७८० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:49 PM2020-09-15T12:49:27+5:302020-09-15T12:50:25+5:30
आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५७८० झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५७८० झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १४५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४९ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये नऊ महिला व ४० पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये तेल्हारा तालुक्यातील दापूरा येथील सहा, एमरॉल्ड कॉलनी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येक तीन, गोडेबोले प्लॉट, मोठी उमरी, बाळापूर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, सोपीनाथ नगर, अशोक नगर, शास्त्री नगर, लहान उमरी, लंगडगंज, बोरगाव मंजू, संभाजी नगर, मलकापूर, नानकनगर, दहिगाव गावंडे, नागे लेआऊट, आश्रय नगर, कौलखेड, चांदुर, गाडगे नगर, आदर्श कॉलनी, जूना तापडीया नगर, सिव्हील लाईन, जीएमसी, केशव नगर, सागूर अडगाव, कृषी नगर, संभाजी नगर, कार्ला बु. ता. तेल्हारा, तेल्हारा, चोहट्टा बाजार, खिरपूरी ता. बाळापूर, रुस्तमाबाद ता. बार्शिटाकळी व कट्यार येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
१२२२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७८० लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४३७२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १८६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १२२२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.