अतिरिक्त वीज बिल प्रकरण पोहोचले ऊर्जामंत्र्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:08 AM2017-07-27T03:08:51+5:302017-07-27T03:08:56+5:30
अकोला : अकोलेकरांना येत असलेल्या अतिरिक्त वीज बिलप्रकरणी महावितरणचे अधिकारी जातीने लक्ष देत नसल्याच्या तीन गंभीर तक्रारी थेट ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे पोहोचल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोलेकरांना येत असलेल्या अतिरिक्त वीज बिलप्रकरणी महावितरणचे अधिकारी जातीने लक्ष देत नसल्याच्या तीन गंभीर तक्रारी थेट ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे पोहोचल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत ऊर्जामंत्री यांनी अकोल्यातील महावितरण कंपनीच्या दोषी अधिकाºयांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
वीज मीटरचे फोटो रिडिंग घेणे आणि बिल वाटप करण्याच्या कंत्राटावरून अकोल्यात दोन कंत्राटी एजन्सीमध्ये वाद सुरू आहे. या वादातून अत्यंत कमी दरात एका एजन्सीने कंत्राट घेतला; मात्र अकोल्यातील १ लाख ३० हजार ग्राहकांपर्यंत ही यंत्रणा पोहोचू शकत नसल्याने बसल्या ठिकाणीच वीज मीटर रिडिंग सुरू झाले आहे. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून वस्तुस्थिती समोर आणली. कंपनीच्या आयटी विभागाचे दाखलेही देण्यात आले. आयटी विभागान लॉक सिस्टीम लावल्यापासूनचा खोटारडापणा समोर येत गेला आणि अतिरिक्त वीज बिलांमुळे अकोलेकर त्रस्त झाल्याने राजकीय पक्षाच्या तीन कार्यकर्त्यांनी हे प्रकरण थेट ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचविले आहे. अतिरिक्त युनिट, अॅव्हरेज बिल देण्याचे काम गत मे महिन्यापासून अकोल्यात सर्रास सुरू आहे. कंत्राटदाराच्या तक्रारी वाढल्याने महावितरणच्या अधिकाºयांनी कंपनीचे कर्मचारी लावून शहरात तपासणी सुरू केली. यात अनेक ठिकाणी तफावत आढळली. याप्रकरणी दोघांवर कारवाई झाली; मात्र अजूनही समस्या सुटलेली नाही. या कार्यकर्त्यांना मंत्री महोदयांनी लवकरच चौकशी करण्याचे सांगितले आहे. आता याप्रकरणी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.