संचारबंदीत होणार अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:18 AM2021-04-16T04:18:28+5:302021-04-16T04:18:28+5:30
शिक्षणाधिकारी होणार सेवानिवृत्त माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांची बुलडाणा येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त पदाचा प्रभार उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार ...
शिक्षणाधिकारी होणार सेवानिवृत्त
माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांची बुलडाणा येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त पदाचा प्रभार उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्याकडे देण्यात आला होता. आता अवचार सुद्धा ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर शिक्षणाधिकारी पदाचा पदभार कोणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे सेवानिवृत्त झाले. आता अवचार निवृत्त होणार आहेत. त्यामुळे उपशिक्षणाधिकाऱ्यांचे दोन्ही पदे रिक्त होतील. शिक्षणाधिकारी पदही रिक्त होणार असल्याने, शिक्षणाधिकारी कार्यालयातील कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करणे गरजेचे आहे. समायोजन पुढे ढकल्यास, कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडण्याची शक्यता आहे. संचारबंदी व कोरोनाचा विचार करून आम्ही नियोजन केले. कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी सकाळी व दुपारी अशा सत्रात कर्मचाऱ्यांना बोलाविले आहे. उपाययोजना व खबरदारी घेऊनच ही प्रक्रिया पार पडणार आहे.
-देवेंद्र अवचार, शिक्षणाधिकारी माध्यमिक