अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी केली घटनास्थळाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 08:22 PM2017-08-03T20:22:30+5:302017-08-03T20:23:21+5:30
कुरुम : माना पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या मधापुरी शिवारात १३ जुलैला अनोळखी इसमाची हत्या करून, मृतदेह मधापुरी येथील सुनील नीळकंठराव ठाकरे यांच्या शेतातील विहिरीत टाकण्यात आला होता. घटनास्थळाची १ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व बुधवारी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुम : माना पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या मधापुरी शिवारात १३ जुलैला अनोळखी इसमाची हत्या करून, मृतदेह मधापुरी येथील सुनील नीळकंठराव ठाकरे यांच्या शेतातील विहिरीत टाकण्यात आला होता. घटनास्थळाची १ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व बुधवारी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी पाहणी केली.
या प्रकरणातील आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
मधापुरी येथे एका अज्ञात इसमाचा खून झाल्याचे १३ जुलै रोजी समोर आले होते. या घटनेतील मृतक हा पश्चिम बंगाल व बांग्लादेश सीमेवरील २४ परगणा मुंशीगिरी येथील रहिवासी लालमहन खगमन मुंडा असल्याचे समोर आले आहे. तो आ पल्या सहकार्यांसह मजुरीकरिता गुजरात कच्छ येथे जात होता. यादरम्यान १२ जुलैला रात्री हावडा-अहमदाबाद ही गाडी कुरुम रेल्वे स्टेशनवर थांबली होती. दरम्यान, अज्ञात आरोपीने लालमहन याची हत्या करून, मृतदेह कुरुम रेल्वे स्टेशनवरून ३ कि.मी. असलेल्या मधापुरी शिवारातील एका शेतातील विहिरीत टाकला होता. या प्रकरणात माना पोलिसांना आरोपींचा शोध लावण्यात अपयश आले आहे. मृतकासोबत असलेल्या मजुरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीसाठी कच्छवरून अकोला येथे आणले होते. मात्र, त्यांच्याकडून कुठलीही माहिती मिळाली नाही. या हत्याकांड प्रकरणाचा छडा लावण्याकरिता १ ऑगस्टला दुपारी अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (एल.सी.बी) घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. बुधवार, २ ऑगस्टला दुपारी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी कुरुम रेल्वे प्लेटफार्मवरून अंदाजे ३ कि.मी. अंतरावर असलेल्या घटनास्थळावर जाऊन बारकाईने निरीक्षण केले. यावेळी त्याच्या समवेत मूर्तिजापूर उ पविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, माना पो.स्टे. ठाणेदार मिलिंदकुमार बाहकर, कुरुम चौकीचे प्रभारी उ पनिरीक्षक राजेश जोशी, माना पो. उपनिरीक्षक चंदू पाटील, पो.कॉ. नीलेश इंगळे, विजय मानकर, संदीप पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे मुंदे, संदीप राऊत, कुरुम, मधापुरी, खोडदचे पोलीस पाटील आदी उपस्थित होते.