बीएलओच्या जबाबदारीसाठी अतिरिक्त शिक्षक टार्गेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 06:50 PM2018-10-20T18:50:20+5:302018-10-20T18:50:34+5:30
अकोला: निवडणुक आयोगाच्या २0१९ च्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमातर्गंत मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या कामासाठी खासगी शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना टार्गेट केल्याचा जात असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.
अकोला: निवडणुक आयोगाच्या २0१९ च्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमातर्गंत मतदार नोंदणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या कामासाठी खासगी शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना टार्गेट केल्याचा जात असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. बीएलओचे काम अतिरिक्त शिक्षकांवर लादल्या जात असल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. निवडणुक कामासाठी अतिरिक्त शिक्षकांवरच जबाबदारी का? असा सवालही उपस्थित होत आहे.
काही दिवसांपूर्वी मतदार यादी पुर्नरिक्षण आणि निवडणुक कामासाठी तहसिल कार्यालयाने माध्यमिक शिक्षण विभागाकडे शिक्षकांची यादी मागितली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेसोबतच खासगी शाळांमधील शिक्षकांच्या नावांची यादी दिली. परंतु या यादीमध्ये नियमित शिक्षकांना शिक्षण विभागाने वगळून अतिरिक्त शिक्षकांची नावे निवडणुक विभागाकडे दिली आहेत. यामुळे अतिरिक्त शिक्षक नाराज झाले आहेत. आम्ही अतिरिक्त ठरलो. म्हणून शिक्षण विभाग वाट्टेल ते काम आमच्यावर थोपविणार आहे का? अतिरिक्त शिक्षक सुद्धा नियमित शिक्षकांसारखे विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करतात. नियमित तासिका घेतात. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना वेगळी वागणुक का? असा सवाल अतिरिक्त शिक्षकांनी उपस्थित केला. शिक्षण विभागाने आमच्यावर अन्याय करू नये. सर्वांना समान वागणुक द्यावी आणि अतिरिक्त ठरलेल्या महिला शिक्षकांना या कामातून वगळण्यात यावे. अशी मागणी अतिरिक्त शिक्षकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
अतिरिक्त शिक्षकांकडे कार्यभार नाही. ते वेतन घेत आहेत. निवडणुकीचे काम राष्ट्रीय कार्य आहे. त्यांनी ते करायलाच हवे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होत नाही. तोपर्यंत त्यांना कार्यभार उपलब्ध होणार नाही. हेवेदावे करू नयेत.
प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी
माध्यमिक जि.प.