आधार ‘लिंक’साठी ७६३ शेतकऱ्यांचा मिळेना पत्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 04:08 PM2020-02-23T16:08:23+5:302020-02-23T16:08:31+5:30

बँक खाते क्रमांक अद्याप आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले नाही.

Address not traced of 763 farmers for Aadhaar link! | आधार ‘लिंक’साठी ७६३ शेतकऱ्यांचा मिळेना पत्ता!

आधार ‘लिंक’साठी ७६३ शेतकऱ्यांचा मिळेना पत्ता!

Next

- संतोष येलकर
अकोला : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी १७ फेबु्रवारीपर्यंत १ लाख ११ हजार ६१६ शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आले आहे. उर्वरित ७६३ शेतकºयांचा पत्ता मिळत नसल्याने त्यांचे बँक खाते क्रमांक अद्याप आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित शेतकºयांचा शोध घेण्याचे काम महसूल विभागाकडून सुरूच आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, पात्र ठरलेल्या शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांचे खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत गत दोन महिन्यांपासून सुरू आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील १ लाख १२ हजार ३७९ शेतकºयांपैकी १ लाख ११ हजार ६१६ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे काम १७ फेबु्रवारीपर्यंत पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित ७६३ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यासाठी संबंधित शेतकºयांचा महसूल विभागाकडून शोध घेण्यात येत आहे; मात्र संबंधित शेतकºयांचा पत्ता अद्याप मिळाला नाही. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या मात्र पत्ता मिळत नसलेल्या ७६३ शेतकºयांचा शोध घेण्याचे काम महसूल विभागाकडून सुरूच आहे.

कर्जमाफीचा लाभ मिळणार कसा?
कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करणे आवश्यक आहे; परंतु जिल्ह्यातील पात्र शेतकºयांपैकी ७६३ शेतकºयांचा शोध घेऊनही पत्ता मिळाला नसल्याने, त्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करणे प्रलंबित आहे. त्यामुळे संबंधित शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार कसा, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांपैकी ज्या शेतकºयांचे बँक खाते क्रमांक अद्याप आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले नाही, अशा शेतकºयांचा पत्ता मिळविणे आणि त्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी.

 

Web Title: Address not traced of 763 farmers for Aadhaar link!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.